Join us

देशातील पहिल्या महिला IAS अन्ना मल्होत्रा यांचे निधन, मुंबईसाठी दिले होते मोठे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 21:54 IST

अन्न रजम यांनी 1951 साली भारतीय प्रशासकीय सेवत पदार्पण केले होते.

मुंबई - स्वतंत्र भारताच्या पहिला महिला आयएएस अधिकारी अन्ना रजम मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री अंधेरी येथील निवासस्थानी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात सन 1927 साली त्यांचा जन्म झाला होता. त्यावेळी त्यांचे नाव अन्ना रजम जॉर्ज असे होते. 

अन्न रजम यांनी 1951 साली भारतीय प्रशासकीय सेवत पदार्पण केले होते. त्यावेळी रजम यांनी प्रशासकीय सेवेसाठी मद्रासची निवड केली होती. अन्ना यांनी आर.एन. मल्होत्रा यांच्याशी विवाह केला, मल्होत्रा हे सन 1985 ते 1990 या पाच वर्षाच्या कालावधीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. मुंबईजवळील आधुनिक जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या स्थापनेत अन्ना रजम यांचे मोठे योगदान होते. त्यामुळेच त्यांच्याकडे जेएनपीटीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तर सन 1989 साली त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दरम्यान, 1982 सालच्या आशियाई स्पर्धेवेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत काम केले आहे. 

टॅग्स :महिलाजेएनपीटीमुंबईराजीव गांधी