महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतातील पहिली १५ डब्यांच्या पूर्ण बनावटीची लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ही लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी( आयसीएफ) मधून१८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. येत्या काळात अशा प्रकारचे आणखी १२ लोकल लवकरच पाठवण्यात येणार असल्याचे आयसीएफकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या विरार–चर्चगेट मार्गावर १५ डब्यांच्या २११ फेऱ्या चालवल्या जातात. त्यापैकी विरार–अंधेरीदरम्यान ११२ फेऱ्या धीम्या मार्गावर चालतात. या फेऱ्या अंधेरीच्या पुढे वांद्रे स्टेशनपर्यंत विस्तारण्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे या चार स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. प्लॅटफॉर्म वाढल्यानंतर विरार–वांद्रे धीम्या मार्गावर मार्गावर १५ डब्यांच्या लोकल नियमितपणे चालवता येणार आहेत.
दरम्यान १५ डब्यांची लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी आणखी पंधरा डब्याच्या ट्रेनची मागणी पश्चिम रेल्वे कडून करण्यात आली होती. त्याची पूर्तता म्हणून नवीन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताब्यात दाखल होणार आहेत.
ही लोकल ऐतिहासिक का ?
यापूर्वी १२ डब्यांच्या लोकल मिळत असून त्यामध्ये तीन डबे वाढवून ती पंधरा डब्यांची करण्यात येत होती. परंतु आता आयसीएफ थेट पंधरा डब्यांची लोकल पुरवत असल्याने याचा फायदा विभागीय रेल्वेला होणार आहे. नवीन १५ डब्यांची लोकलची क्षमता २५ टक्क्यांनी अधिक असल्याने त्यामध्ये अंदाजे ७५५५ प्रवासी गर्दीच्या वेळी प्रवास करू शकतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : Western Railway gets India's first complete 15-car local from Chennai's ICF. This increases capacity by 25%, carrying 7555 passengers. More such locals are expected soon, aiding Virar-Churchgate route expansion with platform extensions underway.
Web Summary : पश्चिम रेलवे को चेन्नई के ICF से भारत की पहली 15-डिब्बों वाली लोकल मिली। इससे क्षमता 25% बढ़ी, 7555 यात्री यात्रा कर सकेंगे। जल्द ही ऐसी और लोकल आने की उम्मीद है, जिससे विरार-चर्चगेट मार्ग विस्तार में मदद मिलेगी।