पकडल्यावर आरोपींचा पलटवार

By Admin | Updated: July 13, 2014 01:54 IST2014-07-13T01:54:11+5:302014-07-13T01:54:11+5:30

रेल्वे प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सतर्कतेने कारवाई केली तर गुन्हा आहे का?

Counterattackers after catching | पकडल्यावर आरोपींचा पलटवार

पकडल्यावर आरोपींचा पलटवार

ठाणो : रेल्वे प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सतर्कतेने कारवाई केली तर गुन्हा आहे का? असे असेल तर मग डय़ुटीवर असलेले पोलीस प्रसिद्धीमाध्यमांसह अन्य कारणांच्या दडपणाखाली जागृतता दाखवण्यास धजावणार नाहीत. त्यातच ज्या गुन्ह्यात रेड हँड पकडले आहे त्या आरोपींनी पलटवार केल्यावर त्याची खातेनिहाय चौकशी होऊन जे काही सत्य समोर येईल ते जाहीर होईलच. मात्र तसे नसतानाही केवळ विशिष्ट राग मनात ठेऊन बातम्या द्यायच्या अन्.. सुरक्षा यंत्रणोचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा काही प्रसिद्धीमाध्यमांनी जो प्रय} केला आहे तो योग्य नसल्याचे मत डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी व्यक्त केले.
29 जून रोजी डोंबिवली रेल्वे स्थानकातील धीम्या अप मार्गावरील फलाटामध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास आलेल्या आसनगाव लोकलमध्ये एका शैलजा देशपांडे नामक महिलेची पर्स चोरण्याचा प्रकार घडला. त्या महिलेने आरडाओरडा करताच गोरेगाव येथे राहणा:या दोन ललिता कोळसे आणि सुचित्र सुहास या दोघींना स्थानकात डय़ुटीवर असलेल्या देशमुख नामक महिला पोलिसाने ताब्यात घेतले. त्यानुसार त्या दोघींकडे देशपांडे यांची पर्स आढळून आली, त्यात पॅन कार्डही मिळाले. आरोपी, फिर्यादी अन् मुद्देमाल असे सर्व काही आढळून आल्यानेच त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्या दोघींनाही रेल्वे न्यायालयाने जामिन मंजूर करून सोडून दिले. या सर्व घटनेत त्या आरोपींनी लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठांकडे 7 जुलै रोजी तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार विभागीय पोलीस सहआयुक्त आर. रेडेकर या चौकशी करीत आहेत. ती चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही़ संबंधित युवतींनी केलेल्या आरोपात तथ्य नसून चौकशीत सर्व काही स्पष्ट होईल, असेही बागवे म्हणाले. (प्रतिनिधी)
 
मोबाइल चौकशीसाठीच घेतले आहेत
च्न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर पुढील तपासासाठी त्यांचे मोबाइल ताब्यात घेतले असून, त्याची सर्व चौकशी सुरू आहे. 
च्त्या चौकशीत हे मोबाइल त्यांचेच होते का, यासह कॉल समरी आदी सर्व तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 
च्जर त्यात काही तथ्य आढळले नाही तर त्यांचे मोबाइल त्यांना परत करणार असल्याचेही बागवे म्हणाले.
 
कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार
च्या प्रकरणाबाबत मी सर्व चौकशांना सामोरे जाण्यास तयार असून, चौकशी वरिष्ठांकडून सुरू झाली आहे. 
च्त्यात काहीही गैर आढळणार नाही. कायद्यानुसारच सर्व कारवाई झाली असल्याने कोणतेही दुमत नसल्याचे बागवे ‘लोकमत’ला म्हणाले.
चौकशी सुरू आह़े़़
या प्रकरणाचा अर्ज संबंधितांकडून मिळाला असून त्याची चौकशी सुरू आहे. आताच काहीही सांगता येणार नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलीस सहआयुक्त आर. रेडकर यांनी दिली.

 

Web Title: Counterattackers after catching