कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा खर्च पालिका करणार

By Admin | Updated: June 28, 2014 00:49 IST2014-06-28T00:49:26+5:302014-06-28T00:49:26+5:30

शाहीद नसीम सय्यद याच्या उपचाराचा सर्व खर्च ठाणो महापालिका उचलणार असल्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला.

The cost of a wounded child in a dog attack | कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा खर्च पालिका करणार

कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा खर्च पालिका करणार

>ठाणो : मुंब्य्रात भटकी कुत्री चावल्याने जखमी झालेल्या शाहीद नसीम सय्यद याच्या उपचाराचा सर्व खर्च ठाणो महापालिका उचलणार असल्याचा ठराव  महासभेत मंजूर करण्यात आला. जखमी झालेल्या शाहीदला उपचारासाठी एक लाख रुपये देण्यात यावेत, असा प्रस्ताव सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडला, त्याला विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिले. परंतु उपचारासाठी यापेक्षाही जो काही वाढीव खर्च होईल तो संपूर्ण दिला जाईल, असे आश्वासन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले. 
दरम्यान, बुधवारी शाहीदला जे.जे. रुग्णालयात दाखल केले.  पोटावर, हातावर चावल्याच्या खुणा आहेत. त्याला रेबिजची इंजेक्शन दिली आहेत.  त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

Web Title: The cost of a wounded child in a dog attack