मुंबई : गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या राम मंदिर रोड ते रिलिफ रोडपर्यंत एस. व्ही. रोड लगत विस्तारीकरणाच्या कामांमध्ये मूळ कंत्राटापेक्षा १८ टक्के म्हणजे ३८ कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे पुलाचा खर्च २०९ कोटींवरून आता २४७ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे.
गोरे पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. मार्च २०१९ पासून या पुलाचे राम मंदिर रोड ते रिलिफ रोडपर्यंत एस. व्ही. रोड लगत विस्तारित बांधकाम हाती घेण्यात आले. त्यावेळी भूमिगत सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या. वालभट नदी आणि ओशिवरा नदी या दोन नद्या ओलांडून हा पूल जात आहे. नद्यांच्या परिसरातील बांधकाम तसेच भरती व ओहोटीचा परिणाम, यामुळे स्ट्रक्चरल स्टील बांधकामाला गंज चढू शकतो. गंज टाळणे तसेच स्टीलचे आयुर्मान वाढवण्यासाठी पुलाच्या सुपर स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टील गर्डर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम करताना ९०० मी. मी. व्यासाची जुनी मलनिस्सारण वाहिनी नव्याने टाकण्याचे ठरविण्यात आले. तसेच इतर बाबींचाही समावेश केल्याने हा खर्च वाढल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२४८ कोटी रुपयेविस्तारित पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह २०९.६४ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते, परंतु हे कंत्राट काम ३८ कोटींनी वाढून आता २४७.९७ कोटी रुपये एवढे झाले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ‘एमईपीएल-ग्यान’ या संयुक्त भागीदारीतील कंपनीची नियुक्ती केली आहे, तर टीपीएफ कंपनी सल्लागार, तर फेरतपासणी सल्लागार म्हणून मे. कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी कंपनी काम पाहत आहे.
Web Summary : Mrunaltai Gore flyover extension costs increased by ₹38 crores, totaling ₹247.97 crores. The rise results from structural upgrades, including stainless steel girders and sewer line replacement, ensuring longevity and improved infrastructure. The project, handled by MEPL-Gyan, aims to enhance connectivity.
Web Summary : मृणालताई गोरे फ्लाईओवर विस्तार की लागत ₹38 करोड़ बढ़कर ₹247.97 करोड़ हो गई। यह वृद्धि स्टेनलेस स्टील गर्डरों और सीवर लाइन प्रतिस्थापन जैसे संरचनात्मक उन्नयन के कारण हुई है, जो दीर्घायु और बेहतर बुनियादी ढांचे को सुनिश्चित करती है। MEPL-Gyan द्वारा संचालित परियोजना का उद्देश्य कनेक्टिविटी को बढ़ाना है।