पालिकेचे लाचखोर अधिकारी जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:07 IST2021-03-24T04:07:15+5:302021-03-24T04:07:15+5:30

मुंबई : बांधकामावरील कारवाई थांबवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. पालिकेच्या एम पूर्व ...

Corrupt municipal officials caught | पालिकेचे लाचखोर अधिकारी जाळयात

पालिकेचे लाचखोर अधिकारी जाळयात

मुंबई : बांधकामावरील कारवाई थांबवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

पालिकेच्या एम पूर्व विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील मासादे आणि कामगार अमर तांबे यांनी बांधकामावरील कारवाई थांबविण्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. तक्रारदारने एसीबीकडे धाव घेताच त्यांनी सापळा रचून मासादे याच्यासह तांबेलाही अटक केली. दोघांकडे एसीबी अधिक तपास करत आहेत.

.....

पूर्वीच्या भांडणातून हत्येचा प्रयत्न

मुंबई : पूर्वीच्या भांडणातून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी तिघांनी साेमवारी मानखुर्द परिसरात महेश सिंग (२९) यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सिंग हे जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: Corrupt municipal officials caught