सुधारित मालमत्ता करास विरोध

By Admin | Updated: January 7, 2015 01:15 IST2015-01-07T01:15:16+5:302015-01-07T01:15:16+5:30

बिल्टअपऐवजी कार्पेट एरियावर मालमत्ता कर आकारल्यास कोट्यवधी रुपयांचा महसूल घटणार आहे़

Corrected property taxes | सुधारित मालमत्ता करास विरोध

सुधारित मालमत्ता करास विरोध

मुंबई : बिल्टअपऐवजी कार्पेट एरियावर मालमत्ता कर आकारल्यास कोट्यवधी रुपयांचा महसूल घटणार आहे़ त्यामुळे सुधारित मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने आणला आहे़ मात्र या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपातूनच विरोधाचा सूर लावला आहे़ एकीकडे रेडीरेकनरचे दर वाढवून सुधारित मालमत्ता कराच्या प्रस्तावाला विरोध करीत भाजपाने दुटप्पी धोरणाचे दर्शन घडविल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे़
जागेच्या बाजारभावानुसार म्हणजेच भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली १ एप्रिल २०१० या पूर्वलक्षी प्रभावाने मुंबईत लागू करण्यात आली आहे़ या करप्रणालीमुळे शहर व उपनगरातील मालमत्ता करामधील तफावत दूर होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे़ परंतु रेडीरेकनरच्या दरावर २० टक्के बिल्टअप जोडून मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर कार्पेट एरियानुसार कर आकारणीचे आदेश न्यायालयाने दिले़
मात्र याचा फटका बसून पालिकेच्या महसुलात २० टक्के घट होणार आहे़ त्यामुळे शंभर टक्क्यांऐवजी १२० टक्के दराने मालमत्ता कर वसूल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे़ मात्र सरकारने आधीच रेडीरेकनरच्या दरामध्ये १५ टक्के वाढ केली असताना मालमत्ता करामध्ये २० टक्के वाढ करून करदात्यांचे कंबरडे मोडण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचा आरोप भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे़ (प्रतिनिधी)

खायचे दात वेगळे
च्पार्किंग दरवाढ, रेडीरेकनर आणि आता मालमत्ता करामध्ये दरवाढ करून भाजपाने मुंबईकरांचे कंबरडेच मोडले आहे़ हे कसले अच्छे दिऩ एकीकडे करवाढ करून मग त्यास विरोध दाखविणाऱ्या भाजपाचे खायचे दात वेगळेच आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी लगावला आहे़
काँग्रेसचा विरोध
च्मालमत्ता कराचा वाढीव बोजा मुंबईकरांच्या खांद्यावर टाकून त्यांना भरडण्याचे काम सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती व प्रशासन करीत आहे़ मात्र ही अन्यायकारक वाढ काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही, असा आंबेरकर यांनी इशारा दिला आहे़

Web Title: Corrected property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.