नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक!, लवकरच अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:20 AM2018-06-19T02:20:15+5:302018-06-19T02:20:15+5:30

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.

Corporators must submit biometric attendance! Immediately implement | नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक!, लवकरच अंमलबजावणी

नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक!, लवकरच अंमलबजावणी

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. सभागृहात प्रवेश करतेवेळी आणि घरी जातेवेळी नगरसेवकांना हजेरी लावावी लागणार आहे. सोमवारीच्या गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. आता याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. परिणामी दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात अनेक विषयांवर चर्चा केली जाते. विकास कामे मंजुर केली जातात. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. अशावेळी नगरसेवकांची हजेरी अत्यंत महत्त्वाची असते. केवळ हजेरी नाही तर पुरेशी संख्याही महत्त्वाची असते. परंतु अनेक वेळा नगरसेवक येथे हजर नसतात. किंवा केवळ स्वाक्षरी पुरते येतात. अशावेळी राजकीय पक्षास अडचणीस सामोरे जावे लागते. परिणामी नगरसेवकांना वेसण घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीची मागणी पुढे आली आहे. त्यानुसार, याबाबतची यंत्रणा सभागृहाच्या प्रवेशद्वारावर लावली जाईल. शिवाय सीसीटिव्ही लावला जाईल. दरम्यान, बायोमेट्रिक नुसार हजेरी लागली नाही तर याचा परिणाम नगरसेवकांच्या भत्त्यावर होणार आहे.

Web Title: Corporators must submit biometric attendance! Immediately implement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.