ग्रामीण आरोग्यासाठी ‘कॉर्पोरेट प्लान’
By Admin | Updated: November 9, 2014 01:57 IST2014-11-09T01:57:16+5:302014-11-09T01:57:16+5:30
ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने अखेर कॉर्पोरेट क्षेत्रची मदत घेण्याचे ठरविले आह़े

ग्रामीण आरोग्यासाठी ‘कॉर्पोरेट प्लान’
नारायण जाधव - ठाणो
राज्यातील ग्रामीण भागांत असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने अखेर कॉर्पोरेट क्षेत्रची मदत घेण्याचे ठरविले आह़े याचाच भाग म्हणून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ अर्थात ‘व्यावसायिक क्षेत्रतील सामाजिक बांधिलकीसंदर्भातील धोरण’ आरोग्य विभागाने निश्चित केले आह़े
या धोरणातील निकषांचे पालन केल्यास राज्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास होण्यास मदत होणार आह़े शिवाय कुपोषण, अर्भक मृत्यू, स्तनदा मातांचे पोषण, प्रजनन दर, माता आणि बाल आरोग्य, ‘आशा’ स्वयंसेविकांच्या विकासाबरोबरच या सर्व ठिकाणी अत्यावश्यक आरोग्य सुविधांबरोबरच त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रतील औद्योगिक कंपन्या, बँका, महामंडळे, अशासकीय संस्था आणि इतर औद्योगिक संस्थांची मदत घेतली जाणार आह़े कंपनी कायदा 2क्क्3 मधील भाग 135 नुसार काम करण्यासाठी किंवा पूर्वी अस्तित्वात असलेल्या इतर कंपनी कायद्यानुसार विविध कामांसाठीच्या खर्चामध्ये व्यावसायिक क्षेत्रतील सामाजिक बांधिलकीअंतर्गत खर्च करणो आवश्यक आह़े सध्या राज्यात काही प्रमाणात यानुसार काही योजना राबविल्या जात असल्या तरी त्यांचा म्हणावा तसा प्रभाव जाणवत नाही़ म्हणूनच आरोग्य विभागाने गेल्या आठवडय़ात व्यावसायिक क्षेत्रतील सामाजिक बांधिलकीअंतर्गत कोणते उपक्रम राबवावेत, ते कसे राबवावेत, यासाठीचे धोरण निश्चित केले आह़े
1राज्यात 23 जिल्हा रुग्णालये, 1क्क् खाटांची 25 उपजिल्हा रुग्णालये, 5क् खाटांची 56 उपजिल्हा रुग्णालये, 4 सामान्य रुग्णालये, 11 महिला रुग्णालये, 2 अतिविशेष रुग्णालये, 387 ग्रामीण रुग्णालये, 1811 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 1क्58क् उपआरोग्य केंद्रे, 4 क्षयरोग रुग्णालये, 4क् फिरती वैद्यकीय पथके आणि 37 आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथके असा आरोग्य खात्याचा सर्वदूर पसारा आह़े
2या धोरणानुसार आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी घालून दिलेल्या अटींनुसार जे प्रस्ताव प्राप्त होतील, ते संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, आयुक्त कुटुंब कल्याण तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडे सादर करावयाचे आहेत़ संबंधित कंपनीने कोणत्या क्षेत्रत काम करणार, हे नमूद करणो आवश्यक असून, तिला आपल्या व्यावसायिक संबंधासाठी किंवा उत्पादने विकण्यासाठी या कराराचा उपयोग होणार नाही़
च्विविध रुग्णालयांतील शस्त्रक्रियागृह, प्रसूतिगृहात साधनसामग्री आणि सुविधा पुरवून त्यांचा दर्जा उंचावणो
च्पायाभूत सुविधा देणो.. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत 24 तास वीजपुरवठा सुरळीत राहावा, याकरिता सौरऊर्जा संच बसविणो. शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्र, रेफ्रीजरेटर बसविणो
च्प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घेऊन त्याची सुधारणा करण्यांतर्गत त्या ठिकाणी शौचालय बांधणो, त्याची दुरुस्ती करणो, खिडक्या-भिंती-छत यांची दुरुस्ती करून गळती थांबविणो, वॉटर हीटर बसविणो, कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती करणो, आरोग्यविषयक शिक्षण पुरविण्यासाठी टीव्ही प्रोजेक्टर बसविणो
च्मेडिकल साहित्य, औषधपुरवठा करणो
च्नवजात बालकांची काळजी घेण्यासाठीचे साहित्य, मशिनरी पुरविणो
च्राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सहकार्य करणो, स्तनदा मातांना पोषक आहार देणो, त्यांचे कौन्सिलिंग करणो
च्आशा स्वयंसेविकांना सहकार्य करणो, इतर संबंधित कर्मचा:यांना प्रशिक्षण देणो, आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्या कौन्सिलिंग क्षमतेत वाढ व्हावी, याकरिता त्यांना प्रशिक्षण, साहित्य, लेखन सामग्री देणो
च्आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणो राबविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पेडीएट्रीसिएन, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या डॉक्टरांच्या विविध संघटनांचे सहकार्य घेणो