Join us  

coronavirus: बेपर्वाईमुळे महिलेचे झाले हाल, १८ वर्षे बीएसईएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:31 AM

सदर महिला ही या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, एका रुग्णामुळे ती कोरोना पॉझिटिव्ह झाली. मात्र काल सकाळी ९ वाजता ती हॉस्पिटलमध्ये आली असताना तिला चक्क बीएसईएस हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने हॉस्पिटलबाहेर बसवून ठेवले.

- मनोहर कुंभेजकर मुंबई - एकीकडे कोरोना रुग्णांकडे सहानुभूतीने बघा, त्याला मदत करा, असे आवाहन राज्य शासन सातत्याने करत आहे. मात्र सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्याचे चक्क हाल झाले आहेत. सदर घटना १८ वर्षे बीएसईएस हॉस्पिटलमध्ये मावशी म्हणून काम करणा=या महिलेच्या बाबतीत घडली.सदर महिला ही या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, एका रुग्णामुळे ती कोरोना पॉझिटिव्ह झाली. मात्र काल सकाळी ९ वाजता ती हॉस्पिटलमध्ये आली असताना तिला चक्क बीएसईएस हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने हॉस्पिटलबाहेर बसवून ठेवले.माझ्या आईला अ‍ॅम्ब्युलन्स आणि कोणती सुविधा दिली नाही. व्यवस्थापनाने तिला घरी जायला सांगितले. अखेर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिला येथील कर्मचाºयाने रिक्षा आणून दिल्यावर ती एकटी तिथे जाऊन अ‍ॅडमिट झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.सदर घटनेचा व्हिडीओ या महिलेने आणि तिच्या मुलाने सोशल मीडियावर व्हायरल केला असून, १८ वर्षे बीएसईएस हॉस्पिटलमध्ये काम करणाºया कर्मचारी महिलेला येथील व्यवस्थापनाने दिलेली सापत्न वागणूक आणि या कोरोना रुग्ण महिलेचे हॉस्पिटलच्या बेपर्वाईमुळे झालेले हाल यांची हृदयद्र्रावक कहाणीच या व्हिडीओमध्ये निर्देशित केली आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन सदर हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी या महिलेच्या मुलाने केली आहे.दरम्यान, या महिलेचा आणि तिच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर बीएसईएस हॉस्पिटलने याप्रकरणी जारी केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, येथील सदर हाऊसकिपिंग खात्यात काम करणा-या महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळली आणि ती आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी आली. आम्ही आमच्या खर्चाने तिची टेस्ट केली.काल सकाळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे रजिस्ट्रार डॉ. अविनाश आणि आयसीयूचे प्रमुख डॉ. जावेदन यांनी संपूर्ण दिवसभर या महिलेला बेड मिळण्यासाठी प्रयत्न केले. अखेर तिला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला असून येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.कारवाईची मागणीकोरोना रुग्ण महिलेच्या हॉस्पिटलच्या बेपर्वाईमुळे झालेल्या हालांची हृदयद्रावक कहाणीच या व्हिडीओमध्ये निर्देशित केली आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन सदर हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी या महिलेच्या मुलाने केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई