Join us  

Coronavirus : ही वेळ सुट्टीची नाही; आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची, नितेश राणेंची कोकणवासीयांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 7:57 AM

रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत.

मुंबईः जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 11267 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.खासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देताच वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. कोकणातील चाकरमानीही गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे गेले चार दिवस कमी गर्दी असलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांना विनंती केली आहे. सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे, कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे!  ही वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची आहे, असंही ट्विट करत नितेश राणे म्हणाले आहेत.  दुसरीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून, जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दुकाने उघडी असल्याने बाजारपेठेतील गर्दी अजून कमी झालेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधी दुकाने वगळता मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड व नागपूर शहरातील सर्व खासगी व्यापारी आस्थापने जवळपास बंद करण्यात आली आहेत. सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता 25 टक्क्यांवर आणली आहे. कालपर्यंत ती 50 टक्के होती. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांमधील, सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला होता. ही शहरे 31 मार्चपर्यंत बंदमुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, पेण, पनवेल, अलिबाग, उरण, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड. या शहरांतील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द-शिक्षणमंत्रीशालेय विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, 9वी व 11वीची उर्वरित परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येणार आहे. मात्र, दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार होईल. दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वगळता इतरांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली

टॅग्स :नीतेश राणे कोरोना वायरस बातम्या