Join us  

Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:25 PM

पालिका आणि राज्य सरकारच्या ५९ तर ७३ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे.

मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसींचा मर्यादित साठा असल्याचा मोठा फटका मुंबईतील लसीकरणाला बसणार आहे. लसींचा साठा संपत आला तरी नवीन साठा उपलब्ध होत नसल्याने रविवारी ३० सार्वजनिक आणि ७ खासगी केंद्रात पहिल्या सत्रात किंवा साठा उपलब्ध असेपर्यंत लस दिली जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि प्रथम येणाऱ्या लाभार्थीस प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लस देण्यात येणार आहे.

पालिका आणि राज्य सरकारच्या ५९ तर ७३ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लास देण्यास पालिकेने सुरुवात केली. आतापर्यंत २२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र मुंबईला दर आठवड्याला दहा लाख लसींची आवश्यकता असताना एक ते दोन लाख लसींचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गेले काही दिवस लस उपलब्ध असेपर्यंतच डोस देण्यात येत आहे. परिणामी १३२ केंद्रांपैकी आता जेमतेम ४० ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

या रुग्णालयांमध्ये रविवारी मिळेल लस ...

ई:  जे. जे. रूग्णालय, भायखळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रूग्णालय, भायखळा: कस्तुरबा रूग्णालय, चिंचपोकळी

एफ/दक्षिण: केईएम रूग्णालय, परळ, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा, एफ/उत्तर : अकवर्थ रुग्णालय, वडाळा

जी/दक्षिण: वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र, वरळी 

जी/ दक्षिण:  ईएसआयएस रुग्णालय, वरळी

एच/पूर्व : व्ही.एन.देसाई रूग्णालय, सांताक्रूझ

एच/पश्चिम: भाभा रूग्णालय, वांद्रे के/पूर्व: शिरोडकर प्रसुतीगृह, विलेपार्ले

के/पूर्व: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी 

के/ पश्चिम: कुपर रूग्णालय, जुहू

पी/ दक्षिण: टोपीवाला दवाखाना,गोरेगाव

पी/ दक्षिण: गोकूळधाम प्रसृतिगृह, गोरेगाव

पी/ दक्षिण: मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव 

पी/ उत्तर: स.का. पाटील रूग्णालय, मालाड

पी/उत्तर: मालवणी सरकारी रूग्णालय, मालाड पी/उत्तर: चौकसी प्रसुतिगृह, मालाड

पी/उत्तर: आप्पापाडा प्रसुतिगृह, मालाड 

आर/ दक्षिण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली आर/ दक्षिण: चारकोप विभाग १ दवाखाना, कांदिवली 

आर/ दक्षिण: आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली 

आर/ दक्षिण: इएसआयएस रूग्णालय, कांदिवली 

आर/ मध्य: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय, बोरिवली

एम/ पूर्व: शताब्दी रूग्णालय, गोवंडी

एम/ पश्चिम : माँ रूग्णालय, चेंबुर

एस: लालबहादूर शास्त्री प्रसुतिगृह, भांडूप 

एस: क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय, विक्रोळी 

खासगी रूग्णालयातील लसीकरण केंद्र:

सी: मित्तल रुग्णालय, चर्नी रोड के/पूर्व: क्रिटीकेअर रुग्णालय, अंधेरी, पी/उत्तर: तुंगा रुग्णालय, मालाड, पी/उत्तर: लाईफ लाईन मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय, मालाड, आर/दक्षिण: शिवम रूग्णालय, कांदिवली, एल विभाग: कोहिनूर रुग्णालय, कुर्ला, एम/पश्चिम:  ईनलॅक्स् रुग्णालय, चेंबूर

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई