गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी मुंबईत सर्वाधिक म्हणजे पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरूवारी पुन्हा एकदा मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत आतापर्यंतचे सर्वाधिक ५ हजार ५०४ रूग्णांची नोंद करण्यात आली. यापूर्वी बुधवारी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजार ५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २ हजार २८१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. दरम्यान, या कालावधीत मुंबईत १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या मुंबईत एकून ३३ हजार ९६१ अॅक्टिव्ह केसेस आहे.
Coronavirus Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:07 IST
Coronavirus Update : मुंबईत सध्या ३३ हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण, मार्च २०२० नंतरची सर्वात नोंदवण्यात आली सर्वात मोठी रुग्णवाढ
Coronavirus Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद
ठळक मुद्देमुंबईत सध्या ३३ हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण,मार्च २०२० नंतरची सर्वात नोंदवण्यात आली सर्वात मोठी रुग्णवाढ