Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राॅबर्ट वाड्रांना काेराेना, प्रियांका गांधी सेल्फ आयसाेलेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:38 IST

coronavirus: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती उद्याेजक राॅबर्ट वाड्रा यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर प्रियांका यांनी दिल्ली येथील निवासस्थानी पतीसह गृहविलगीकरणाचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती उद्याेजक राॅबर्ट वाड्रा यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर प्रियांका यांनी दिल्ली येथील निवासस्थानी पतीसह गृहविलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. प्रियांका यांनी आसाम, तामिळनाडू आणि केरळमधील निवडणूक प्रचार दाैरे रद्द केले आहेत.  राॅबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवरून त्यांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रियांका यांनीही ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर करून सविस्तर माहिती दिली. प्रियांका यांची काेराेना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या दाेन मुलांचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे.मात्र, डाॅक्टरांचा सल्ला आणि नियमावलीनुसार त्यांना काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. प्रियांका यांचा शुक्रवारी आसाम, शनिवारी तामिळनाडू आणि रविवारी केरळमध्ये निवडणूक प्रचारासाठी दाैरा हाेता. मात्र, ताे आता रद्द करण्यात आला आहे. प्रचारासाठी जाऊ न शकल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.

टॅग्स :रॉबर्ट वाड्राप्रियंका गांधी