Join us

coronavirus: सिमेंट, स्टीलच्या किमती वाढल्याने बांधकाम उद्योगावर दरवाढीचा बोजा, घरांच्या किमती वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:04 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंद्यांची वाट लागली आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे आधीच फटका बसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता महागाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई : बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सिमेंट, स्टील आणि लोखंडाच्या किमती अचानक वाढल्याने बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. यामुळे भविष्यात घरांच्या किमती कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असल्याने बांधकाम व्यावसायिकांना नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंद्यांची वाट लागली आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे आधीच फटका बसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता महागाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.सिमेंट,लोखंड, स्टीलच्या किमती वाढल्याने अचानक मोठा आर्थिक भार बांधकाम व्यावसायिकांना सहन करावा लागणार आहे. त्याचा फटका अर्थातच बांधकाम उद्योगाला बसणार असल्याचा दावा विकासकांनी केला आहे. यामुळे घरांच्या किमती कमी करण्याची इच्छा असली तरी तसे करता येणार नाही, याकडे या विकासकांनी लक्ष वेधले.दुसऱ्या लॉकडाउनच्या वेळी बांधकाम उद्योग सुरू व्हावा यासाठीचे आदेश सरकारने जारी केले होते. बांधकामाच्या ज्या ठिकाणी मजूर आहेत त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास परवानगी देण्यास हिरवा कंदील दाखविला होता. परंतु याबाबतचा निर्णय त्यांनी राज्य सरकारांवर सोपविला होता. रेड झोनमध्ये परवानगी द्यायची किंवा नाही, याचा निर्णय राज्यांनी त्या त्या परिसरातील पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविला होता. त्यांनी बांधकाम सुरू करण्यासाठी अटी घातल्या होत्या. सिमेंट आणि लोखंडात झालेल्या दरवाढीची बाब ‘कॉन्फर्डेशन आॅफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया’ने (क्रेडाई) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी संरक्षण मंत्रालयाला पत्राद्वारे कळविली आहे. या किमतींवर केंद्र सरकारने नियंत्रण आणण्याची मागणी या संघटनेने केली आहे.बांधकाम उद्योग केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक संरक्षण मिळाल्याशिवाय पुन्हा उभा राहणे कठीण आहे. अशावेळी सिमेंट, लोखंड उत्पादकांकडून अचानक भाववाढ करणे म्हणजे विकासकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असे मत ‘क्रेडाई’चे कार्याध्यक्ष जक्षय शाह यांनी व्यक्त केले.देशभरात सिमेंटच्या प्रत्येक गोणीमागे शंभर ते दीडशे रुपये वाढ झाली असल्याने ही वाढ बांधकाम खर्चात जोडली जाणार आहे. तसेच बांधकामासाठी लागणाºया लोखंडाच्या किमतीत प्रति मेट्रिक टनमागे दोन ते अडीच हजार रुपये वाढ झाल्याने तोही भार व्यावसायिकांना उचलावा लागेल. यामुळे अशा वेळी किमती कमी होण्याऐवजी निश्चितच अधिक होणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.बांधकामाच्या ज्या ठिकाणी मजूर आहेत त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास परवानगी देण्यास हिरवा कंदील दाखविला होता. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसायमुंबई