Join us

कोरोना व्हायरस -१९; केवळ एक जण निरीक्षणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 03:57 IST

८६ जणांना डिस्चार्ज; मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरूच

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या (कोविड - १९) पार्श्वभूमीवर सध्या केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली दाखल आहे. आतापर्यंत ८६ जणांना घरी सोडण्यात आले असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनसह अन्य नऊ देशांतील प्रवाशांची तपासणी सुरूच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ४२५ विमानांमधील ५२ हजार २२९ प्रवासी तपासण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत ८७ जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी ८६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांनी दिला आहे. आतापर्यंत भरती झालेल्या ८७ प्रवाशांपैकी ८६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना