Join us  

Coronavirus : फक्त १० टक्के रिक्षा-टॅक्सी सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 2:21 AM

स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले की, कोरोनामुळे अनेकांनी रिक्षा- टॅक्सी बंद केल्या आहेत. उत्तर भारतातील ५० टक्के रिक्षा-टॅक्सी चालक गावी गेले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळत लोकांना या काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला रिक्षा-टॅक्सी चालकांनी पाठिंबा दर्शविला आहे, परंतु रुग्णालये, रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा सुरू राहणार आहेत. मुंबईत एकूण ५ ते १० टक्के रिक्षा-टॅक्सी सुरू राहतील, असे रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सांगितले आहे.याबाबत टॅक्सी मेन्स युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रॉस म्हणाले की, रविवारी ठेवण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’नुसार संपूर्ण देश बंद ठेवण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर न पडता घरात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु गरजेनुसार या दिवशी टॅक्सी चालविण्यात येणार आहे, तसेच आमचे बहुतांश टॅक्सी चालक हे गावाला गेले असून, अनेक जण घरीच बसणार आहे. त्यामुळे रस्त्यावर केवळ ५ ते १० टक्के रिक्षा-टॅक्सी असणार आहेत.स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले की, कोरोनामुळे अनेकांनी रिक्षा- टॅक्सी बंद केल्या आहेत. उत्तर भारतातील ५० टक्के रिक्षा-टॅक्सी चालक गावी गेले आहेत.शनिवारी केवळ ३० टक्के रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर होत्या, पण जनता कर्फ्यूमुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, परंतु काही गाड्या येणार आहेत. प्रवासी येतील त्या ठिकाणी, तसेच रुग्णालय परिसरातही रिक्षा-टॅक्सीची आवश्यकता असेल. त्यामुळे रविवारी साधारणपणे ५ ते १० टक्के रिक्षा सुरू राहतील.पूर्णपणे रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहनकोरोनामुळे देशात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी केले. प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आम्ही रिक्षा चालकांना १०० टक्के बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे, असे रिक्षा चालक-मालक सेनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस