Join us  

coronavirus: राज्यात दैनंदिन काेराेना मृत्यूंची संख्या दोन अंकांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 4:21 AM

coronavirus News: सोमवारी ८४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या ८४ बळींमध्ये सर्वाधिक मृत्यू मुंबईतील असून ही संख्या ३७ आहे. राज्याचा मृत्युदर २.६३ टक्के असून बरे होण्याचा दर ८९.२ टक्के आहे.

मुंबई : राज्यात सात महिन्यांनंतर कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या तीन अंकांवरून दोन अंकी संख्येवर आली. सोमवारी ८४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या ८४ बळींमध्ये सर्वाधिक मृत्यू मुंबईतील असून ही संख्या ३७ आहे. राज्याचा मृत्युदर २.६३ टक्के असून बरे होण्याचा दर ८९.२ टक्के आहे.दिवसभरात ९,९०५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण कोविडमुक्त झाले. सध्या १ लाख ३४ हजार १३७ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी काेराेनाचे ३,६४५ रुग्ण आढळले. बाधितांची संख्या १६ लाख ४८ हजार ६६५ झाली. दिवसभरातील ८४ मृत्यूंमध्ये मुंबई ३७, ठाणे २, नवी मुंबई मनपा ३, कल्याण-डोंबिवली मनपा २, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भाईंदर मनपा ६, वसई-विरार मनपा १, नाशिक १, पुणे २, पुणे मनपा १  आदी रुग्णांचा समावेश आहे. 

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ८०४ रुग्ण आढळले असून ३७ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ५२ हजार ८५ वर पोहोचली असून बळींचा आकडा १०,१४२ झाला आहे. मुंबईत आतापर्यंत २ लाख २३ हजार ५८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १७,८६० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८८ टक्क्यांवर  आला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १३२ दिवसांवर पाेहाेचला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई