Join us

Coronavirus:...तोपर्यंत मुंबई-पुण्यात नो-एंट्री; कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 03:04 IST

एमएमआर, पीएमआर, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आणि मालेगाव महापालिका क्षेत्र या रेड झोनमधील खासगी कार्यालये १७ मे पर्यंत बंदच राहणार आहेत.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगरपालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे. जोपर्यंत संबंधित महानगरपालिका आयुक्त, त्यांच्या क्षेत्रातील कोरोनाबाधित प्रभागाची हद्द ठरवत नाहीत, तोपर्यंत या भागातून महाराष्ट्रात कोठेही जाता अथवा येता येणार नाही. मात्र, या प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

लॉकडाउनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील अधिकार आता संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आलेले आहेत. मुंबई, पुणे येथून बाहेर जाण्याच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह, मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. पोलीस ठाण्यांची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपायुक्तांकडे पाठविली जाईल. यानंतर अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

खासगी कार्यालये बंद राहणारएमएमआर, पीएमआर, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आणि मालेगाव महापालिका क्षेत्र या रेड झोनमधील खासगी कार्यालये १७ मे पर्यंत बंदच राहणार आहेत. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या