Join us  

Coronavirus: कोविड केंद्रात सामान्यांना प्रवेशबंदी; रुग्णांखेरीज कुटुंब व नातेवाईकांना येण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 1:08 AM

वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्रामध्ये रुग्णांखेरीज कुटुंब व नातेवाईकांना प्रवेशास बंदी आहे. रुग्णांना आवश्यक काही वस्तू वा औषधे प्रवेशद्वाराजवळ रुग्णाची माहितीशी द्यावे लागते.

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. परिणामी, शहर उपनगरातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयांत आणि जम्बो कोविड केंद्रांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. कोविड केंद्रांमध्ये रुग्णांखेरीज अन्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध असल्याची बाब रिअ‍ॅलिटी चेकद्वारे समोर आले आहे.

वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्रामध्ये रुग्णांखेरीज कुटुंब व नातेवाईकांना प्रवेशास बंदी आहे. रुग्णांना आवश्यक काही वस्तू वा औषधे प्रवेशद्वाराजवळ रुग्णाची माहितीशी द्यावे लागते. याखेरीज, या केंद्रात रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे कुटुंबिय वा नातेवाईकांना माहिती दिली जाते, अशी माहिती केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र डेरे यांनी दिली आहे.  त्याचप्रमाणे गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रांमध्येही प्रवेशद्वाराजवळ मदतकक्ष करण्यात आला आहे. या कक्षात रुग्णांच्या नातेवाईक वा कुटुंबियांना द्वयाच्या वस्तूस येथे जमा करण्यात येतात. शहर उपनगरातील ही दोन मोठी जम्बो कोविड केंद्र असून संसर्ग नियंत्रणात या केंद्राचे मोठे योगदान आहे. या केंद्रात सकाळी ११ ते १ च्या दरम्यान आणि सायंकाळी ४ ते ६ पर्यंत अन्य कुटुंबिय वा नातेवाईकांची आवश्यक वस्तू देण्यासाठी रीघ असल्याचे दिसून येते, मात्र या वेळेसही कोरोना मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात येते अशी माहिती नेस्को कोविड केंद्राच्या प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस