गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मुंबईतही आता कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आता रात्रीची संचारबंदी लागू करणं आवश्यक असल्याचं मत मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. "रात्रीची संचारबंदी लागू करणं आता आवश्यक झालं आहे असं मला वाटतं. तसंच आम्ही गर्दी होत असलेले बाजार दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत करण्यावरही विचार करत आहोत," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्यांनी एएनआयशी बोलताना यावर भाष्य केलं. मुंबईकरांना आता लॉकडाऊनपासून वाचण्यासाठी एकत्र मिळून काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Coronavirus : मुंबईत नाईट कर्फ्यू आवश्यक; पाहा लॉकडाऊन बद्दल काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 16:20 IST
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसंच मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Coronavirus : मुंबईत नाईट कर्फ्यू आवश्यक; पाहा लॉकडाऊन बद्दल काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर
ठळक मुद्देदोन आठवड्यात झपाट्यानं वाढलं रुग्णगेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ