Join us

CoronaVirus News : ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:08 IST

रुग्णालयात करण्यात आलेल्या कोरोनावरील उपचाराअंती आता मधु मंगेश कर्णिक यांची प्रकृती बरी असून, ते घरी परतले आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी वयाच्या ८९व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यापूर्वीच बायपास सर्जरी झाली आहे.रुग्णालयात करण्यात आलेल्या कोरोनावरील उपचाराअंती आता मधु मंगेश कर्णिक यांची प्रकृती बरी असून, ते घरी परतले आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मधु मंगेश कर्णिक ै‘प्राप्तकाल’ ही कादंबरी लिहित होते. आता ही कादंबरी पर्ू्ण करू, असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस