Join us  

CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्सचा पुढाकार; उपलब्ध करून दिल्या ८७५ खाट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 4:48 PM

CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्सचं आणखी एक महत्त्वाचं पाऊस

मुंबई: शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने (आरएफ) शहरातील कोविड व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत मदतकार्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरचे सहकार्य अधिक वाढवत करताना मुंबईतील कोविडविरोधातील लढाईसाठी रिलायन्सने आणखी चार उपक्रम राबविले आहेत.सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामार्फत (आरएफएच) एनएससीआय येथे ६५० खाटांचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला आहे. रिलायन्स फाऊंडेशन नवीन अतिदक्षता विभागातील १०० खाटांची उपलब्धतता तसेच व्यवस्थापन करेल. ही सुविधा येत्या १५ मे २०२१ पासून प्रत्यक्षात अस्तित्वात येईल. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय सध्या कार्यरत ५५० खाटांच्या विभागाचे (वार्ड) येत्या १ मेपासून व्यवस्थापन व परिचलन करणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण ६५० खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल. याशिवाय रुग्णांसाठी अविरत वैद्यकीय व्यवस्थापन हाताळण्यासाठी डाक्टर, परिचारिका तसेच अ-वैद्यकीय कर्मचाऱयांचा समावेश असलेला ५०० जणांचा चमू उपलब्ध करून देईल.रिलायन्स फाऊंडेशनतर्फे अति दक्षता विभागातील खाटा तसेच कृत्रिम श्वसन यंत्रणा, विविध वैद्यकीय उपकरणे आदींचा एकूण प्रकल्प खर्च तसेच ६५० खाटांच्या परिचलनासाठी येणारा सर्व खर्च केला जाईल. एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील. गेल्या वर्षी रिलायन्स फाऊंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशातील पहिले कोविड रुग्णालय मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात २२५ खाटांच्या सुविधेसह उभे केले होते. पैकी अति दक्षता विभागातील २० खाटांसह १०० खाटांचे संपूर्ण व्यवस्थापन सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातर्फे केले जात आहे.सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता अतिदक्षता विभागातील २५ खाटांसह विस्तारण्यात आली आहे. परिणामी अतिदक्षता विभागातील ४५ खाटांसह एकूण १२५ खाटांचे व्यवस्थापन आता रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामार्फत होईल. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील द ट्रायडंट हॉटेलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किरकोळ लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी १०० खाटांची सुविधा आहे. ही सुविधेचे व्यवस्थापन आता सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करेल. 

टॅग्स :रिलायन्सकोरोना वायरस बातम्या