Join us  

Oxygen Man Shahnawaz Shaikh : देवदूत! कोरोनाग्रस्तांसाठी 'त्याने' घेतला पुढाकार; ऑक्सिजन सिलिंडरसाठी विकली 23 लाखांची कार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 12:33 PM

CoronaVirus Oxygen Man Shahnawaz Shaikh : शाहनवाजने लोकांच्या मदतीसाठी स्वत:ची तब्बल 23 लाखांची SUV कार विकली आणि लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहे.

मुंबई - कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,84,657 वर पोहोचला आहे. देशातील अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव, व्हेंटिलेटर आणि बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून मुंबईतही वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे. अशाच वेळी एका तरुणाने कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. शाहनवाज शेख (Shahnawaz Shaikh) असं या मुंबईच्या तरुणाचं नाव असून तो कोरोनाच्या संकटात लोकांसाठी देवदूत बनला आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करत आहे. विशेश म्हणजे शाहनवाजने लोकांच्या मदतीसाठी स्वत:ची तब्बल 23 लाखांची SUV कार विकली आणि लोकांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहे. यामुळेच तो आता मुंबईत ऑक्सिजन मॅन (Oxygen Man) म्हणून ओळखला जात आहेत.

शाहनवाज शेख हा एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करत आहे. लोकांच्या मदतीसाठी तयार त्यांच्या टीमने यासाठी एक कंट्रोल रुमही तयार केलं आहे. जेणेकरुन रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळू शकेल. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याच्या एका मित्राच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या पत्नीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शाहनवाज यांना धक्का बसला आणि त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं. त्यानंतर तो मुंबईतील कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचं काम करत आहे. त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजन सिलिंडर असल्याची माहिती शाहनवाज यांनी दिली. 

शाहनवाजने स्वत:ची 23 लाख रुपयांची SUV कार विकली. स्वत:ची फोर्ड एंडेव्हर ही कार विकत त्यांनी 160 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तसेच 40 सिलिंडर भाड्याने घेतले. असे एकूण त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजनचे सिलिंडर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परिस्थिती अधिक कठीण आहे. जानेवारीत ऑक्सिजन मागणीसाठी त्यांना 50 कॉल येत होते, तर आज दररोज 500 ते 600 फोन येत आहेत. पण, दुर्दैव म्हणजे आता आम्ही केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहोत असं त्याने म्हटलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कार्याचा अनेकांना फायदा होतो झाला. गरजूंना ते ऑक्सिजनचे सिलिंडर देत आहेत. कोरोनात त्याने आता जवळपास 4 हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांची मदत केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्यामुंबई