Join us  

CoronaVirus News: राज्यातील मोठ्या शहरांतच अधिक उद्रेक; दिवसभरात १६०६ नवीन रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:58 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यात शनिवारी एकूण १ हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३० हजार ७०६ झाला आहे. दिवसभरात ६७ बाधितांना आपला जीव गमवावा लागला.

मुंबई : राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येने सलग चौथ्या दिवशी पंधराशेचा आकडा पार केला. मात्र, यातील १३७५ रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर शहरांतील आहेत. निवडक शहरांमध्ये कोरोनाचे आकडे वाढत असले तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र दिलासादायक चित्र आहे. शिवाय, दिवसभरात ५२४ रुग्ण बरे झाले. सलग तिसऱ्या दिवशी ही संख्या पाचशेच्या पुढे असून आतापर्यंत ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात शनिवारी एकूण १ हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३० हजार ७०६ झाला आहे. दिवसभरात ६७ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. शनिवारी झालेल्या मृत्यंूपैकी मुंबईमधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भार्इंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे.आजच्या मृत्यूंमध्ये ४७ पुरुष तर २० महिला आहेत. ६७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत. २५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत; तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१६ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १४ हजार ४३४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६०.९३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.निमलष्करी दलाच्या नऊतुकड्या राज्यात पोहोचल्यामुंबई : राज्य शासनाने मागणी केल्यानुसार केंद्राने निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी४ तर शनिवारी ५ तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या. या तुकड्या मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावती येथे तैनात करण्यात आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत'ला सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या कामात या तुकड्या मदत करतील. तसेच रमजान, आषाढी पालखी, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही भूमिका बजावतील.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई