Join us  

CoronaVirus News: उपाययोजनांना जिम चालकांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 3:05 AM

जान है तो जहान है; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर घेतली भूमिका

मुंबई : ‘जान है तो जहान है’, या उक्तीनुसार जीव राहिला, तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहोत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत जो निर्णय घ्यावा लागेल त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे जिम चालकांनी स्पष्ट केले. व्यायाम शाळांचे मालक, संचालकांशी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे,  महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष निखिल राजपुरीया, करण तलरेजा, अभिमन्यू सावळे, योगिनी पाटील, गुरुजीत सिंह, शालिनी भार्गव, खजानीस महेश गायकवाड, हेमंत दरडे, राजेश देसाई, परुळेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, परिस्थिती अशीच राहिली तर राज्य गर्तेत जाईल. यापूर्वीही निर्बंध आपण हळूहळू लावले होते आणि पुन्हा हळूहळू शिथिल केले होते. तशीच वेळ आली आहे, महाराष्ट्राच्या हिताचा मार्ग स्वीकारायला हवा. जो निर्णय घेऊ सगळ्यांच्या हिताचा असाच असेल. त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे