Join us  

CoronaVirus News : मृत्यू लपवू नका, चाचण्या वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:57 AM

रूग्णालयाबाहेर झालेले ६०० मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तत्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केल्यानंतर कोरोनाबाबत आढळलेली वस्तुस्थिती व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. मृत्यू लपवू नका, चाचण्या वाढवा असे या पत्रात म्हटले आहे.यातील मुद्यांवर आपल्याला चर्चा करावी वाटल्यास आपल्याला प्रत्यक्ष भेटून या मुद्यांचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना इत्यादींबाबत प्रत्यक्ष माहिती देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.रूग्णालयाबाहेर झालेले ६०० मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तत्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून येणाऱ्या काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स व आॅक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेड उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.११ गुन्हे दाखलमारहाणीत मरण पावलेल्या विशाल भोसलेवर कर्जत, जामखेड, बारामती, आष्टी, अंभोरासह अनेक ठिकाणी दरोडा, चोरी आणि घरफोडीचे अकरापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस