Join us  

CoronaVirus News: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; ३१ मेनंतर निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 3:18 AM

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्च रोजी संपले होते आणि पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली होती.

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. ते एक तर पुढे ढकलले जाईल किंवा रद्द होऊ शकते.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्च रोजी संपले होते आणि पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाचा संकटकाळ असल्याने अधिवेशनाबाबत अनिश्चितता आहे. 02 अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांचे अंतर नियमानुसार असावे लागते. अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्च रोजी संपले होते, याचा अर्थ पावसाळी अधिवेशन सप्टेंबरपर्यंत घेता येऊ शकेल.

22 आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी अधिवेशन घ्यावे, असा प्रयत्न असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन रद्द करण्याचाही विचार होऊ शकतो. याआधी अधिवेशन रद्द करण्याचे प्रसंग घडलेले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविधानसभा