Join us  

CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 4:32 AM

CoronaVirus News : राज्यात १,४२,९०० रुग्ण झाले असून ६,७३९ बळी गेले आहेत. सध्या राज्यात ६२,३५४ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आता दीड लाखांच्या टप्प्यावर आहे. पण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात बुधवारी ३,८९० नवीन रुग्णांची नोंद झाली असून २०८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात १,४२,९०० रुग्ण झाले असून ६,७३९ बळी गेले आहेत. सध्या राज्यात ६२,३५४ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात बुधवारी २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बळींचा आकडा ६,७३९ झाला आहे, सध्या राज्यातील मृत्यूदर ४.७२ टक्के एवढा आहे. ४८ तासात झालेले ७२ मृत्यू हे मुंबई मनपा-३८, ठाणे मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, नाशिक मनपा-४, जळगाव-१, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१०, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-२, जालना-१, उस्मानाबाद-२, अकोला मनपा-२, बुलडाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत. मुंबईत ६९,५२८ इतके बाधित रुग्ण असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३७,००८ एवढी आहे.मागील कालावधीतील १३६ मृत्यूंमध्ये मुंबईतील ८२, सोलापूर -१३,नाशिक -१०, नवी मुंबई -९, जळगाव -८, कल्याण डोंबिवली -५, ठाणे -३, उल्हास नगर -१, भिवंडी -१, पिंपरी चिंचवड -१, अकोला -१, सातारा -१ व इतर राज्यातील १ यांचा समावेश आहे. आजपर्यंत पाठविलेल्या ८ लाख २३ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ४२ हजार ९०० नमुने पॉझिटिव्ह (१७.३४ टक्के) आले आहेत. राज्यात ५,५७,९४८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ३३,५८१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.>एकूण रुग्णसंख्येत तरुणाई अधिकराज्याच्या रुग्णसंख्येने १ लाख ४२ हजारांचा टप्पा ओलांडला असून या रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण तरुण वयातील आहेत. अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना (कोविड)चा अधिक धोका आहे. राज्यातील रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील २५ हजार ५२५ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील २६ हजार ८५८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या राज्यभरात लॉकडाऊन शिथिल झाला असल्याने सर्वत्र वर्दळ वाढली आहे. मात्र अशा स्थिती आता सर्व वयोगटातील व्यक्तींनी खबरदारी घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :राजेश टोपेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या