Join us  

CoronaVirus News : राज्यात तब्बल ८ हजार ४७० बालकांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 3:31 AM

राज्यात २४ मे रोजी ४७,०२१ बाधित होते. त्यात १० वर्षांच्या आतील १,६८६ मुले होती. महिनाभरानंतर रुग्ण प्रचंड वाढले. राज्य शासनाच्या २५ जूनच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या १,३८,७६५ इतकी झाली.

मुंबई : कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे तर बालकांचे प्रमाण सर्वात कमी होते. मात्र, आता बालकांचे प्रमाण वाढत असून ते दोनवरून ३.६९ टक्क्यांपर्यंत गेले आहे. सध्या नवजात बालक ते १० वर्षांपर्यंत तब्बल ८,४७० बालके कोरोनाग्रस्त आहेत. अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.६९% आहे.राज्यात २४ मे रोजी ४७,०२१ बाधित होते. त्यात १० वर्षांच्या आतील १,६८६ मुले होती. महिनाभरानंतर रुग्ण प्रचंड वाढले. राज्य शासनाच्या २५ जूनच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या १,३८,७६५ इतकी झाली. त्यात १० वर्षांच्या आतील ५,१०३ मुले आहेत. महिन्याभरात लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले.बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली शिरोमणी यांनी सांगितले की, लहान मुलांना याचा धोका कमी आहे, हे दिलासादायक आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कामुळे त्यांना संसर्ग होऊ शकतो; पण लहान मुलांमध्ये लक्षणे ही सौम्य आहेत. तसेच, सर्व वयोगटामध्ये लहान मुलांमध्ये मृत्यूदर कमी, म्हणजे ०.२ टक्के आहे. तोही कुपोषित, हृदय रोग, जन्मजात फुप्फुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस