Join us  

CoronaVirus News : राज्यातील ४२८ पोलिसांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 6:06 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनावर मात करून सेवेत रुजू होणाºया पोलिसांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने म्हटले, ‘मला माहिती होते की, माझ्या कुटुंबात फक्त ४ माणसे नसून तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात.

मुंबई : राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,३८८ वर पोहोचला असून यात १४२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपचार घेत ४२८ कोरोना योद्धा बरे झाले आहेत. यापैकी काही जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.कोरोनावर मात करून सेवेत रुजू होणाºया पोलिसांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने म्हटले, ‘मला माहिती होते की, माझ्या कुटुंबात फक्त ४ माणसे नसून तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात. तुमच्यासाठी लवकर बरे होण्याच्या जिद्दीतून कोरोनावर मात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याबाबतचा व्हिडिओ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टिष्ट्वट केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई