Join us  

CoronaVirus in Mumbai : आणखीन दोन लहानग्यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:43 AM

CoronaVirus in Mumbai : मुंबईत गुरुवारी एकूण १५ रुग्णांचे निदान झाले आहे. यात मुंबईतील नऊ आणि मुंबईबाहेरील सहा रुग्णांचा समावेश आहे.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या देशात कोरोनाच्या स्थानिक संसर्ग प्रसाराचा टप्पा सुरू झाला आहे. दिल्ली, पुणे, मुंबई आणि नागपूर येथे आढळलेल्या काही रुग्णांनी कोणताही प्रवास केलेला नाही आणि कोरोनाबाधित रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क आला नाही. तरीही त्यांना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता तरी निदान एकमेकांशी संपर्क टाळून घरी सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईत गुरुवारी एकूण १५ रुग्णांचे निदान झाले आहे. यात मुंबईतील नऊ आणि मुंबईबाहेरील सहा रुग्णांचा समावेश आहे.शुक्रवारी निकट संपर्कातून आणखीन दोन लहानग्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. १४ वर्षांचा मुलगा आणि १६ वर्र्षांच्या मुलीचा समावेश असून, त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.२६ मार्चचा तपशीलवय लिंग पत्ता प्रवास/संपर्क१४ पुरुष मुंबई निकट संपर्क१६ महिला मुंबई निकट संपर्क३० महिला मुंबई निकट संपर्क४१ पुरुष मुंबई निकट संपर्क४० महिला मुंबई निकट संपर्क८५ पुरुष मुंबई निकट संपर्क४२ पुरुष उपनगर निकट संपर्क२६ पुरुष डोंबिवली तुर्की२८ महिला नवी मुंबई उपलब्ध नाही२८ महिला ठाणे यु.के.३९ पुरुष ठाणे यु.के.३३ महिला वाशी उपलब्ध नाही३० महिला शहर यु.ए.ई.५१ पुरुष उपनगर उपलब्ध नाही६२ पुरुष पुणे उपलब्ध नाही

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस