Join us  

Coronavirus: कोविड केंद्रे बनली मुंबईकरांसाठी आधारवड; महापालिकेचे नियोजन ठरले यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 8:34 AM

गणेशोत्सवात वाढलेला संसर्ग झाला हळूहळू कमी 

शेफाली परब-पंडित  

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मे महिन्याच्या अखेरीस एक लाखापर्यंत पोहोचेल, असा अंदाज होता. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने संशयित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू केली.  कोविड काळजी केंद्राच्या माध्यमातून तब्बल ६० ते ७० हजार खाटांची क्षमता वाढवण्यात आली. मात्र कोणतीही लक्षणे व गंभीर आजार नसलेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाइन राहण्यास सांगितले जात आहे. तर सध्या २० हजार ७९० सक्रिय रुग्णांपैकी ७३६३ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. त्यामुळे ७० टक्क्यांहून अधिक कोविड केंद्रे बंद करण्यात आली आहेत. 

सप्टेंबर महिन्यात रुग्णांचा आकडा वाढला. दररोज दोन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत.  तर आतापर्यंत दोन लाख ३६ हजार ७२५ बाधित रुग्णांपैकी दोन लाख तीन हजार ४६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

खासगी कोविड सेंटरचा दररोजचा खर्च? 

महापालिकेने ३३ खाजगी मोठी रुग्णालये, २७ छोटे नर्सिंग होम आणि काही खाजगी कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे.

 दोन हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत बिलामध्ये सूट देण्यात आली आहे.  - डॉ. वैभव देवगिरकर, वैद्यकीय संचालक, हिंदुसभा रुग्णालय

चाचणीचे प्रमाण वाढविल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत असली तरी तूर्तास कोरोना काळजी केंद्रांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. मात्र भविष्यात गरज भासल्यास बंद केलेली संस्थात्मक विलगीकरण केंद्रे कार्यान्वित करता येतील. - सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिकाकोरोना सकारात्मक बातम्या