Join us

CoronaVirus: भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण; माहीममधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 01:58 IST

महापालिकेने मंडई केली सील; पोलीस तैनात

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी भाजी खरेदीसाठी गर्दी करणे कसे धोकादायक ठरते, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. माहिम येथील एल.जे. मार्गावर महापालिकेच्या गोपीटँक मंडईबाहेर लॉकडाउननंतरही मासे खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे दिसून येत होते. याच मंडईच्या एका भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने ही मंडई सील केली आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मुंबईत २० एप्रिलपासून काही नागरी सेवा - सुविधा व किराणा माल, भाजीविक्री, मत्स्यउद्योग यांना सूट देण्यात आली आहे. भाजी, मासे खरेदीसाठी काही ठिकाणी मुंबईकर पुन्हा गर्दी करू लागले आहेत. माहीम येथील गोपीटँक मंडईबाहेर दर आठवड्यातील रविवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी मासे खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असते.या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.या मंडईतील एका भाजी विक्रेत्याच्या चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मंडईतील अन्य भाजी विक्रेत्यांना तिथेच क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व भाजीविक्रेत्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या संपर्कातील अन्य लोकांचा शोध महापालिका घेत आहे. गोपीटँक मंडई पुढचे दोन आठवडे बंद राहणार आहे. तसेच मंडईत कोणी जाऊ नये, यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.माहीम-दादरमध्ये वाढती रुग्णसंख्यादादर परिसरात आतापर्यंत २९ रुग्ण सापडले असून ७३ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर माहीम परिसरात आतापर्यंत २५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी एका ८६ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.सर्व भाजीविक्रेत्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्केसंपर्कातील अन्य लोकांचा महापालिका घेत आहे शोध

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस