Join us  

coronavirus: धारावीत सहा महिन्यांनंतर सापडले सर्वाधिक ३० रुग्ण; दादर, माहीममध्येही वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 8:05 PM

coronavirus in Dharavi : धारावी विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गुरुवारी दिवसभरात ३० बाधित रुग्ण सापडले असून याआधी सहा महिन्यांनंतर रुग्ण संख्येत एवढी वाढ झाली आहे.

मुंबई - धारावी विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गुरुवारी दिवसभरात ३० बाधित रुग्ण सापडले असून याआधी सहा महिन्यांनंतर रुग्ण संख्येत एवढी वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर दादरमध्ये ४१ आणि माही भागात ३१ बाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात जी उत्तर विभागात एकूण १०२ बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. (The highest number of 30 patients was found in Dharavi after six months)

कोरोनाचा प्रसार मार्च २०२० मध्ये झाल्यानंतर जी उत्तर विभाग म्हणजेच धारावी, दादर आणि माहीम परिसर हॉटस्पॉट बनला होता. मात्र, आशिया खंडातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग, मिशन झिरो अशी मोहीम राबवून कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणला, धारावी पॅटर्नने तर जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला. सप्टेंबर महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. धारावी, दादर, माहीममध्ये अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली. 

मात्र गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धारावी, दादर आणि माहीम भागातही रुग्ण वाढ अधिक आहे. गुरुवारी धारावीत तब्बल ३० रुग्णांची नोंद झाली. याआधी ११ सप्टेंबर २०२० रोजी ३३ बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतरचीही एका दिवसातील सर्वात मोठी रुग्ण आहे. दादरमध्ये गुरुवारी सर्वाधिक ४१ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जी उत्तर विभागातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ६७३ वर पोहोचली आहे. 

१८ मार्च रोजी स्थिती परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...दादर....५३५४....२४३.....४९४५धारावी....४३२८....१४०....३८७२माहीम....५२६८....२९०....४८२४ 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई