Join us  

CoronaVirus: राज्यात दिवसभरात कोरोनाचे १२,६१४ रुग्ण, १ लाख ५६ हजार जणांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:27 AM

सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ४०९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या १२,६१४ रुग्णांचे निदान झाले असून ३२२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ८४ हजार ७५४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८२ टक्के असून मृत्युदर ३.३८ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ४०९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यात शनिवारी ६,८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत ४ लाख ८ हजार २८६ रुग्ण कोविडमुक्त झाले. एकूण मृत्यू १९ हजार ७४९ झाले. सध्या १० लाख ४४ हजार ९७४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ३७ हजार ५२४ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३२२ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे १८, ठाणे मनपा ७, नवी मुंबई मनपा ४, कल्याण-डोंबिवली मनपा ११, उल्हासनगर मनपा ७, भिवंडी- निजामपूर मनपा ३, मीरा-भार्इंदर मनपा १०, पालघर १२, वसई-विरार मनपा ६, रायगड ३, पनवेल मनपा ६, नाशिक ४, नाशिक मनपा ६, अहमदनगर १, धुळे २, धुळे मनपा ३, जळगाव ६, जळगाव मनपा २, नंदुरबार २, पुणे २५, पुणे मनपा ३४ आणि अन्य राज्य, देशातील १ अशा विविध ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.>मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिकमुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार २५४ रुग्ण आढळले असून ४८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २७ हजार ७१६ व मृतांचा आकडा ७ हजार ८६ झाला आहे. सध्या १७ हजार ५८१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १ लाख २ हजार ७४९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाणे व पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. ठाण्यात १९,५४२ तर पुण्यात ४१,०८० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस