Join us  

CoronaVirus फूड पॅकेट नको; आमचे मोबाइल रिचार्ज करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 6:40 AM

मजुरांच्या छावण्यांमध्ये विनवणी : रिचार्ज संपल्याने कुटुंबीयांशी तुटला संपर्क

मुंबई : ठाण्यातील काही तरुण सोमवारी मजुरांच्या छावण्यांमध्ये अन्नवाटपासाठी गेले होते. एका मजुराने विनंती केल्यामुळे त्याच्या मोबाइलचे सिमकार्ड एका तरुणाने आॅनलाइन रिचार्ज करून दिले. ही बातमी छावणीत पसरल्यानंतर अनेकांनी फूड पॅकेट सोडून या तरुणालाच गराडा घातला. मोबाइल बंद पडल्याने गावी संपर्क तुटला आहे. अन्न खूप जण देतात. तुम्ही मोबाइल रिचार्ज करून दिला तर उपकार होतील, अशी विनवणी हे मजूर करत होते.

कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर भीतीपोटी अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावांकडे निघाले होते. त्यांना सरकारने वेगवेगळ्या छावण्यांमध्ये रोखून ठेवले आहे. तिथे त्यांना अन्न दिले जाते. आरोग्य तपासणी होते. सुरक्षेसाठी मास्कही मिळतात. मात्र, सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर मजुरांना मोबाइल रिचार्जची चिंता असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश मजूर प्री पेड पद्धतीने १४ किंवा २१ दिवसांचे रिचार्ज करत असतात. २१ मार्चला लॉकडाउन झाल्यापासून रिचार्ज करणाऱ्या दुकानांचे शटर डाउन आहे. मजुरांकडे क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा गुगल पेसारखे पर्याय नाही. आॅनलाइन रिचार्ज करता येत नसल्याने अनेकांचे फोन बंद झाले आहेत. या संकटकाळात परराज्यात असलेल्या कुटुंबाशी संपर्क तुटल्यामुळे ते अस्वस्थ झालेले दिसतात. केवळ मजूरच नाही, अनेक गरिबांच्या वस्त्यांमध्ये मोबाइल रिचार्जची ही समस्या भेडसावत असल्याची माहिती हाती आली आहे.

१० टक्के मोबाइल बंद?च्महाराष्ट्रातील लोकसंख्या १२ कोटींच्या आसपास असली तरी येथे मोबाइल जोडण्यांची संख्या १३ कोटी ४० लाख असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली होती.च्मोबाइल वापरणाऱ्यांपैकी जवळपास ८५ टक्के हे प्रीपेड ग्राहक आहेत. त्यापैकी ४० टक्के ग्राहक आॅनलाइन पद्धतीने भरणा करतात, तर एकूण ग्राहकांपैकी महिन्यापेक्षा कमी कालावधीचे रिचार्ज करणाºयांचे प्रमाण २५ टक्क्यांच्या आसपास आहे.च्त्यापैकी काही जणांनी आपल्या परिचित व्यक्तींच्या साहाय्याने आॅनलाइन रिचार्ज केले असले तरी किमान १० ते १२ टक्के फोन रिचार्जअभावी बंद पडले असतील, अशी शक्यता ठाण्यातील एका मोबाइल विक्रेत्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या