Join us  

coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा पाचवा बळी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:12 AM

शिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षकाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आहे.  राज्यभरात पोलिसांभोवती कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई पोलीस दलात कोरोनाने पाचवा बळी घेतला आहे. शिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षकाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आहे.  राज्यभरात पोलिसांभोवती कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. यातच मुंबई पोलीस दलातील आणखीन एक बळी घेतल्याने पोलीस दल पुन्हा एकदा हादरले आहे. यामुळे राज्य पोलीस दलातील हा आकड़ा आठ वर गेला आहे.  तर कोरोनाबाधित पोलिसांची संख्या हजार पार केली असून हा आकड़ा दिवसेंदिवस वाढत आहे. 

दरम्यान, 

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक विळखा असलेल्या मुंबईसाठी आज दिलासा मिळाला आहे. नव्या कोरोना रग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. तर आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हा आकडा ७०० ते ९०० च्या आसपास जात होता. तर आज यात निम्म्याने घट झाली आहे. दिवसभरात २०३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज ६१३ संभाव्य कोरोनाबाधितांना भरती करण्यात आले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई पोलीस