Join us  

coronavirus: राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, काही ठिकाणी लॉकडाऊनची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 9:44 PM

coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील इतर भागातही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. (coronavirus in Maharashtra) मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील इतर भागातही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे निर्माण होत असलेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कठोर पावले उचलू शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.  (Coronavirus situation critical in the Maharashtra, possibility of lockdown in some places, fears health minister Rajesh Tope) एनडीटीव्हीशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शब्दाचा वापरसुद्धा खूप सावधपणे केला आणि गरज भासल्यासा काही जिल्ह्यांमध्ये याबाबतची पावले उचलली जातील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन लावण्याचे अधिकार दिले जातील. जनतेला नियमांचे पालन करावे लागेल. नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या दंडामध्ये वाढ केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यापूर्वी काही महिन्यांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत होती. देशात कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्रातील बाधितांची संख्या ही अधिक राहिलेली आहे. राज्यात आतापर्यंत २२ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

वाढत्या रुग्णसंख्येसाठी आरोग्यमंत्र्यांनी जनतेच्या बेफिकीरीबरोबरच शासन, प्रशासनामधील शिथिलताही जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाबाबत कुणाच्याही मनात फारसे गांभीर्य राहिलेले नाही. नियमांचे पालन करवून घेण्याबाबत सरकारी यंत्रणेमध्येही काही प्रमाणात ढिलाई दिसून आली. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या संचारबंदीसह शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपे