Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बोरिवलीत कोरोनाचा पहिला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 22:17 IST

बोरिवली पश्चिम साईबाबा नगर येथील 66 वर्षीय कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारा दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.

मुंबई- बोरीवलीत  कोरोनाचा आज पहिला मृत्यू झाला. पालिकेच्या आर मध्य वॉर्ड मधील बोरिवली पश्चिम साईबाबा नगर येथील 66 वर्षीय कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारा दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.

आज मितीस आर मध्य वॉर्ड मध्ये एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पालिका प्रशासनाने येथील 6 ठिकाणे सील केली आहे. येथील भागात जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना पालिकेतर्फे जीवनाव्यश्यक वस्तू व भाजीपाल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या