Join us  

coronavirus : मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी, 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 9:37 AM

राज्यात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आता आणखी एकाचा जीव गेला आहे.

ठळक मुद्देराज्यात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आता आणखी एकाचा जीव गेला आहे.मुंबईत कोरोनानं फिलिपिन्सवरून आलेल्या 68 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला मधुमेह आणि दम्याचा त्रास होता. 13 मार्चला त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई- राज्यात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आता आणखी एकाचा जीव गेला आहे. मुंबईत कोरोनानं फिलिपिन्सवरून आलेल्या 68 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णाला मधुमेह आणि दम्याचा त्रास होता. 13 मार्चला त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचं निदान झाल्यानंतर मूत्रपिंड आणि श्वसनाचा त्या रुग्णाचा त्रास अधिक तीव्र झाला होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला आहे. फिलिपिन्समधून आलेल्या प्रवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेला हा आठवा रुग्ण आहे. गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे.रविवारी राज्यात 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील 4, मुंबईचे 5 तर नवी मुंबई येथील 1 रुग्ण आहेत. राज्यातील बाधितांची संख्या आता 74 झाली होती. आता ती संख्या वाढून 89वर गेली आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा बळी होता. दोन दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते आहे. हे थांबवायचे असेल तर सरकारच्या सूचनांचे पालन करा. यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देताना अत्यावश्यक सेवा देणा-या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस