Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: १०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण; रुग्णालयातील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 22:41 IST

पालिकेच्या सायन म्हणजेच लोकमान्य टिळकरुग्णालयात १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे

मुंबई – मुंबईत पालिका व खासगीरुग्णालयांतील जवळपास १०० हून अधिक आऱोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेधक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. वेळोवेळी पालिका व खासगी रुग्णालयांतील कर्मचारीसुरक्षेचा अभाव असल्याचे सांगत आहेत. गुरुवारीही जे.जे रुग्णालयातील ४८ वैद्यकीयकर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे, सायन रुग्णालयातही ९०  वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अलगीकऱण केल्याचे समोर आल्यानेकर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे

पालिकेच्या सायन म्हणजेच लोकमान्य टिळकरुग्णालयात १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. यात सहायय्क मेट्रन, पाचपरिचारिका , सर्जिकल आणि पॅथालॉजी विभागातील वैद्यकीय तज्ज्ञ, पाच शिपाईयांचाही समावेश आहे. तसेच नव्वद वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.गुरुवारी लो.टिळक रुग्णालयातील उपहारगृह बंद ठेवण्यात आले होते, फक्त पार्सल सेवादेण्यात येईल असे येथील कर्मचाऱ्यांना सांगितले. रुग्णालयातील परिचारिकांना कोरोनाचासंसर्ग असलेल्या रूग्णांसाठी ड्युटी लावण्यात आली असली तरीही पीपीई किट्स, एन ९५मास्क   देण्यात आलेले नाही असे परिचारिकांचे म्हणणे आहे.यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहॉस्पिटल