Join us  

Coronavirus : सावधान! सॅनिटायझर्समध्ये मेथॅनॉल वापरून विक्री, सीबीआयचा दक्षतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 7:46 PM

परदेशातून ऑनलाईन नोंदणीबरोबरच, सॅनिटायझर्समध्ये मेथॅनॉलचा वापर करून विक्री करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहेत, त्याबाबत योग्य दक्षता बाळगण्याचा इशारा केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) केले आहे.

ठळक मुद्देसर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी बाळगण्यासाठी उपाय योजना राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिथे कोरोना (साथीच्या रोग) साथीच्या रोगादरम्यान सॅनिटायझर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बनावट हँड सॅनिटायझर्स तयार करण्यासाठी मिथेनॉलचा वापर आढळून आला.

मुंबई - कोरोनाच्या महामारीच्या संकटात जगभरातील नागरिक सापडले असताना आता काही समाजकंटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याला प्रतिबंधात्मक पीपीई किट, मास्क या  साधनाच्या विक्रीतून फसवणूक केली जात आहे. परदेशातून ऑनलाईन नोंदणीबरोबरच, सॅनिटायझर्समध्ये मेथॅनॉलचा वापर करून विक्री करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहेत, त्याबाबत योग्य दक्षता बाळगण्याचा इशारा केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) केले आहे.   सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी बाळगण्यासाठी उपाय योजना राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी करून पीपीई किट मागविणाऱ्या व्यापाऱ्यांना आगावू रक्कम आकारून आर्थिक गंडा घातला आहे, अशी अनेक उदाहरणे समोर येत असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. अन्य देशात घडत असलेल्या या प्रकाराबाबत इंटरपोलकडून आलेल्या इशाऱ्यानंतर सीबीआयने देशभरातील सुरक्षा यंत्रणाना त्याबाबत कळविले आहे.  यामध्ये  पीपीई विक्रेते आणि कोरोना साथीच्या इतर संरक्षणात्मक उपकरणे पुरवठादार म्हणून संपर्क साधतात, ग्राहकांशी ऑनलाईन व्यवहार व्यवहार करून बँक हस्तांतरणाद्वारे पैसे प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही वस्तूची डिलिव्हरी करत नाहीत. हॅन्ड सॅनिटायझर्समध्ये मेथॅनॉलचा वापर केला जात आहे. इतर देशांमध्ये अशी घटना नोंदवली गेली आहेत. जिथे कोरोना (साथीच्या रोग) साथीच्या रोगादरम्यान सॅनिटायझर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बनावट हँड सॅनिटायझर्स तयार करण्यासाठी मिथेनॉलचा वापर आढळून आला. मॅथेनॉल मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी व  धोकादायक असून त्याबाबत जागरूकता बाळण्याची सूचना सीबीआयने केली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यागुन्हा अन्वेषण विभागमुंबई