Join us  

Coronavirus : सॅनफ्रान्सिस्कोत अडकलेल्या १३१ भारतीय क्रू सदस्यांना परत आणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 3:31 AM

हॉलंड अमेरिका लाइन यांच्या मालकीच्या ग्रँड प्रिन्सेस क्रूझवर प्रवास करणाऱ्या १३१ भारतीय सदस्यांच्या कुटुंबातील वसई येथील एडलर रॉड्रिंक्स या क्रू शिप सदस्यांचा गॉडफ्रे पिमेंटा यांना सकाळी फोन आला.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथे जहाजावर अडकलेल्या १३१ भारतीयांची मदत करा, अशी याचना या भारतीयांनी केली आहे. त्यांची ही मागणी परराष्ट्र मंत्रालय आणि नौकानयन मंत्र्यांकडे पोहोचविण्यात आली आहे. त्यात त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.हॉलंड अमेरिका लाइन यांच्या मालकीच्या ग्रँड प्रिन्सेस क्रूझवर प्रवास करणाऱ्या १३१ भारतीय सदस्यांच्या कुटुंबातील वसई येथील एडलर रॉड्रिंक्स या क्रू शिप सदस्यांचा गॉडफ्रे पिमेंटा यांना सकाळी फोन आला. त्या वेळी आमच्या सर्व १३१ सदस्यांना भारतात आणण्यासाठी लवकर हालचाली करण्याची त्यांनी विनंती केली. या वेळी या जहाजाच्या कॅप्टनने आमच्या वैद्यकीय चाचणीचे पैसे सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरण्यास नकार दिल्याने आपल्या देशात येणाचे स्वप्न भंगले. त्यामुळे आम्ही परत आमच्या जहाजावर परतलो. आता आमचे जहाज आॅकलंडला जाणार आहे. सध्या १५ दिवस तरी आम्ही सॅनफ्रान्सिस्कोजवळील समुद्रात असू. त्यामुळे जास्त उशीर करू नका, आमची सुटका करा, अशी विनंती एडलर रॉड्रिंक्स यांनी केली आहे.ग्रँड प्रिंसेस क्रूझ हे जहाज अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को बे येथे नांगरलेले आहे. रविवारी १३१ भारतीयांना चार्टर फ्लाइटद्वारे आणण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी हे सर्व जण सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर येण्यास निघाले.मात्र, त्यांची बस वैद्यकीय चाचणीसाठी अडवून ठेवली. जहाजाच्या कॅप्टनने वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा जहाजावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी कैफियत रॉड्रिंक्स यांनी मांडल्याचे पिमेंटा यांनी सांगितले....अन्यथा या कर्मचाºयांच्या जीवितास धोकासॅनफ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील कर्मचा-यांनीही क्रूझवर अडकलेल्या १३१ कर्मचा-यांची लवकर सुटका करण्यासाठी मदत दिली पाहिजे; अन्यथा या कर्मचाºयांच्या जीवितास धोका आहे, अशी विनंती निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.

टॅग्स :कोरोनाअमेरिकाभारत