Join us  

Coronavirus: कोरोनाबाधित डॉक्टरने केलेले उपचार सैफी रुग्णालयाला महागात; पालिकेची कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 12:27 AM

चौदा दिवस शस्त्रक्रिया व बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचे आदेश

मुंबई – मुंबईच्या सैफी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने सैफी रुग्णालयावर कठोर कारवाई केल्याची माहिती उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी शनिवारी दिली.‌ या रुग्णालयात पुढील चौदा दिवसांकरिता शस्त्रक्रिया व बाह्यरुग्ण विभाग बंद करण्यात आला आहे, याविषयी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात आली आहे. ‌

मुंबईतील सैफी रुग्णालयामधील सर्जन आणि त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आले. या सर्जनच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला. हे सर्जन कोरोना बाधित असूनही त्यांनी रुग्णांवर उपचार केले. ही बाब अत्यंत गंभीर असून त्याची त्वरित दखल घेत पालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या सर्जन डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंध म्हणून सर्वांचे स्वाब नमुने घेण्यात आले असल्याचेही डॉ. शहा यांनी सांगितले. याआधी हिंदुजा रुग्णालयातील एका रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला असताना तेथील कर्मचारी डॉक्टर यांची स्वाब चाचणी करण्यात आली होती.

संसर्गजन्य आजाराच्या मार्गदर्शक तत्वाने शस्त्रक्रिया, अतिदक्षता व बाह्यरुग्ण विभाग असलेला मजलाच सील करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. सैफी रुग्णालयातील दाखल रुग्णांना इतरत्र हॉस्पीटलमध्ये हलविण्यास सुरुवात केली आहे. सैफी रुग्णालयातील दाखल रुग्णांना इतरत्र हॉस्पीटलमध्ये हलविण्यास सुरुवात केली आहे. 

हे आहे कारवाईचे स्वरुप‘त्या’ डॉक्टरांनी उपचार केलेले पाच रुग्ण विशेष देखरेखीखालीअति-कमीजोखमीच्या लोकांची स्वाब चाचणी करण्यात आलीपाच अतिजोखमीच्या लोकांचे अलगीकऱण केलेनऊ जणांचे सैफी वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण केलेसंपूर्ण रुग्णालयात निजंर्तुकीकरण५६ रुग्णांना संपूर्ण वैद्यकीय चाचण्यानंतर डिस्चार्जअत्यावश्यक उपचार भासणाऱ्या रुग्णांना अन्य खासगी रुग्णालयात दाखल केले

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका