Join us  

coronavirus: केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकची सक्ती, महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 2:20 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच पालिकेतील सर्व कर्मचा-यांची बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे आता सर्वच पालिका कर्मचा-यांच्या शंभर टक्के उपस्थितीचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे.

मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरी अखेर रद्द करण्यात आली आहे. अन्य कर्मचा-यांना मस्टरवर हजेरी लावण्याची सवलत दिली असताना खरे कोविड योद्धा असलेल्या वैद्यकीय कर्मचाºयांना आता बायोमेट्रिक सक्तीचे केले आहे. यामुळे पालिका रुग्णालय व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच पालिकेतील सर्व कर्मचा-यांची बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे आता सर्वच पालिका कर्मचा-यांच्या शंभर टक्के उपस्थितीचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे. त्याचबरोबर कर्मचाºयांची बायोमेट्रिक हजेरीही ६ जुलैपासून सुरू करण्यात आली होती. परंतु कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरूच असल्याने बायोमेट्रिक हजेरी कर्मचाºयांसाठी धोकादायक असल्याचा युक्तिवाद कामगार संघटनांनी केला.याबाबत पालिका प्रशासनाने आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत बायोमेट्रिकचा निर्णय मागे घेण्याबाबत सहमती झाली. त्याबाबत पालिकेने परिपत्रक काढून सरसकट बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे घेत केवळ पालिका रुग्णालयांतील कर्मचाºयांसाठी बायोमेट्रिक बंधनकारक केले आहे.यामुळे गेले चार महिने कोरोनाशी अविरत लढा देणाºया वैद्यकीय कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी लावणे अन्यायकारक असल्याचा सूर कामगार संघटनांनी लावला आहे.कर्मचाºयांची एकदाच वैद्यकीय तपासणीपालिका रुग्णालये किंवा दवाखान्यातून कोरोनामुक्त झालेल्या पालिका कर्मचाºयांना रुग्ण बरा झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, कामावर हजर होण्यासाठी पालिका प्रशासन कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाº­याला पुन्हा वैद्यकीय तपासणी करायला लावते. मात्र, आता अशी तपासणी न करता कर्मचाºयांना थेट कामावर रुजू होता येणार आहे.ंवैद्यकीय कर्मचाºयांचा बायोमेट्रिकवर बहिष्कारपालिका रुग्णालय, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी काम करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या जवळपास पंधरा ते वीस हजारांच्या आसपास आहे. गेले चार महिने हे कर्मचारी अविरत काम करीत आहेत. तरीही त्यांना आता बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात येत असल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. या कर्मचाºयांनी बायोमेट्रिक करू नये, असे आवाहन कामगार संघटनेने केले आहे. त्यानुसार काही कर्मचाºयांनी बुधवारी बायोमेट्रिक हजेरी लावली नाही, अशी माहिती दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका