Join us  

coronavirus: बेस्टमध्ये ९५ कर्मचारी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 4:50 AM

लॉकडाउन सुरू झाल्यापासून १०,९७२ कामगारांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सहा हजार कर्मचाºयांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आल्या.

मुंबई : बेस्ट उपक्रमातील ९५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ कर्मचा-यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून १०,९७२ कामगारांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सहा हजार कर्मचाºयांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आल्या. तर हाय रिस्क गटातील दीड हजार लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.कोरोनाचा सहावा बळीबेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातील ५७ वर्षीय कर्मचा-याला ५ मे रोजी ताप आला होता. त्याने तापावर फॅमिली डॉक्टरकडे उपचार करणे सुरू ठेवले. परंतु त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे ९ मे रोजी ते स्वत:हून नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. १२ मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. नवी मुंबईतील कोणत्याही रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई