Join us  

coronavirus: सायन रुग्णालयातील २६ डॉक्टर झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:12 AM

कोरोनावर मात करून हे डॉक्टर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण १३३ डॉक्टर आणि ५३ नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला.

मुंबई : कोरोना व्हायसरचा मुंबईत जास्त प्रार्दुभाव पाहायला मिळतो. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना दिसताहेत. यात पोलिस, डॉक्टर, परिचारिका, पालिका कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून  सेवा बजावताहेत. त्यातही पोलीस असो वा डॉक्टर, नर्स यांनाही आपले कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आनंदाची बातमी म्हणजे, सायन रुग्णालयातील २६ निवासी डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.कोरोनावर मात करून हे डॉक्टर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण १३३ डॉक्टर आणि ५३ नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, सायन येथील हे रुग्णालय शहरातील सर्वात व्यस्त रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयातील २६ निवासी डॉक्टरांनी कोरोनावर मात केली. रुग्णालयाच्या औषध विभागात ६६ पदव्युत्तर निवासी डॉक्टरांपैकी ३५ जणांना गेल्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी २६ जण कामावर रुजू झाले असून ५ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तर चार जण क्वांरटाइन आहेत. हे सर्व जण पुन्हा कामावर येण्यास उत्सुक आहेत.आतापर्यंत सायन रुग्णालयातील सुमारे १३३ डॉक्टर आणि ५६ नर्सेसना कोरोना व्हायसरची लागण झाली. त्यापैकी ८५ हे निवासी डॉक्टर आहेत. यापैकी एका डॉक्टरवर तब्बल ३७ दिवस सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या १२ वेळा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेथे त्यांना १५ मे रोजी दाखल करण्यात आले होते. ते २३ जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईडॉक्टर