मुंबई : मुंबईत शुक्रवारी कोरोनामुळे १ हजार २६९ रुग्णांचे निदान झाले असून ११४ मृत्यू झाले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाले आहे.शुक्रवारी दिवसभरात ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ११४ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू १५ जूनपूर्वीचे आहेत. तर ५५ मृत्यू १६ ते १८ जूनदरम्यानचे आहेत. ७९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ७८ रुग्ण पुरुष तर ३६ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ९ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. तर ५५ जणांचे वय ६० हून अधिक होते. उर्वरित ५० रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते.दरम्यान धारावी परिसरातील महाराष्ट्र निसर्गोद्यान आवारात कोरोना हेल्थ सेंटर तयार केले असून २०० आॅक्सीजन खाटांची क्षमता आहे. अंदाजे २२०० चौरस फूट क्षेत्रफळावर जलावरोधक उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये प्रत्येक रुग्णाच्या खाटेला आॅक्सीजनचा पुरवठा आहे. मध्यम स्वरुपाची बाधा असलेल्या कोरोना बाधितांना त्याचा लाभ होणार आहे.
CoronaVirus News: मुंबईत कोरोनामुळे आणखी ११४ बळी; रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 02:53 IST