Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यासाठी १० लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 03:19 IST

ग्रामपंचायत स्तरावर त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येत आहे,

मुंबई : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार कोविड - १९ विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यातील ग्रामीण भागात विशेष काळजी घेण्यात येत असून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येत आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांत सर्वांना विशेषत: विलगीकरण केंद्र, रुग्णालये, दलित वस्ती, झोपडपट्टी, वृद्धाश्रम इत्यादींना मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा कसा होईल यादृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतींची निवड करताना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती, प्रादुर्भाव झालेल्या शहरी ठिकाणांच्या शेजारील ग्रामपंचायती, जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केलेल्या ग्रामपंचायती अशा ग्रामपंचायतींची निवड करावी. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा वापर केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, पाणी गुणवत्ता चाचणी संचाची खरेदी करावी, पाणीपुरवठासंबंधित सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा करावा अशा सूचना संबंधितांना दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या